ग्रा. पं.सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे यांच्या स्तुत्य उपक्रम.!जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. (रावेर/प्रतिनिधी.. दि.16 विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील रेंभोटे येथील ग्रा. पं. सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम चे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे यांनी 79 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रेंभोटे येथे सलग दुसऱ्या वर्षी गाढे यांनी हा उपक्रम सुरू ठेवत शालेय साहित्य वाटप करण्यात आले असुन विद्यार्थी यांचे भविष्य घडवणारी व मोठे मोठे अधिकारी निर्माण करणे व आपली मराठी शाळा टिकावी म्हणून विद्यार्थांना व्यक्तिगत प्रोत्साहन म्हणून त्यांना वही,पेन, पेन्सिल,खोडरब्बर, शॉपनर इ.साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मा.सरपंच सौ.सपना कोळी, उपसरपंच सौ.संध्या महाजन,योगेश चौधरी,सुरेश पाटील, पंकज वाघ, प्रशांत पाटील, डिगंबर पाटील, प्रल्हाद गाढे,कांतीलाल गाढे, गणेश पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, लक्ष्मीबाई गाढे, आनंदा सपकाळे, विजय पाटील, सुनील महाजन, संजय गाढे, संजीवनी गाढे, इमामशाह फकीर,राहुल गाढे, प्रेम गाढे,ग्रामसेविका कपिला गावित ,संध्या महाजन, अर्चना महाजन, सविता पाटील, प्रज्ञा वाघ, जी प शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, उपशिक्षिका भाग्यश्री बेंडाळे व ग्रामपंचायत शिपाई व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रा. पं.सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे यांच्या स्तुत्य उपक्रम.!जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..                      
Previous Post Next Post