भद्रावतीत शिवसेनेतर्फे आज भव्य दहीहंडी महोत्सव; विविध स्पर्धा व तब्बल ३लाख १५ हजाराची बक्षीस रक्कम... ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.16:- - पारंपरिक संस्कृतीला उजाळा देत आणि युवकांना एकत्र आणत शिवसेना वरोरा-भद्रावतीच्या वतीने भद्रावती शहरात आज भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, बंगाली कॅम्प येथे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुप्रसिद्ध लावणी नृत्यकलावंत उज्वला पुणेकर आपल्या नृत्याने तर विनोदी अँकर परेश आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. दहीहंडी महोत्सवात फक्त पारंपरिक गोविंदा पथकांसाठीच नव्हे, तर रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, तसेच सध्याच्या सोशल मीडिया ट्रेंडनुसार ‘रिल्स’ स्पर्धा यांचाही समावेश करण्यात आला आहे. भद्रावतीतील महिला भजन मंडळांचा विशेष सन्मान करून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची भव्य बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे स्पर्धकांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना वरोरा-भद्रावतीतील नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून, आयोजकांनी सर्व नागरिकांना या भव्य सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहून आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे.

भद्रावतीत शिवसेनेतर्फे आज भव्य दहीहंडी महोत्सव; विविध स्पर्धा व तब्बल ३लाख १५ हजाराची बक्षीस रक्कम...                                                                                    
Previous Post Next Post