*१००८ स्वामी राघव चैतन्य महाराज लोक कल्याणासाठी रूढी शाळेस अकरा हजाराची भेट.*. (मानवत परभणी / बातमीदार.*अनिल चव्हाण). ——————————————*अकरा हजार देणगी मूळे रूढीकर भारावले ; सामाजीक बांधिलकीतून रूढी जि.प. शाळेस ह.भ.प. स्वामी १००८ राघव चैतन्य महाराज यांच्या कडून लोक कल्याणा करीता भरीव मदतमानवत तालूक्यातील अध्यात्म केंद्र म्हणून औळखल्या जाणार्या मौजे रूढी आश्रमाचे आचार्य ह. भ. प. १००८ स्वामी राघव चैतन्य महाराज यांनी तालूक्यातील रूढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील बालकांच्या सर्वांगीण विकास व उज्ज्वल भविष्यासाठी व शाळेच्या सर्वांगीण भौतिक विकासासाठी उदार श्रीहस्ते ₹११,०००/- हजार इतका निधी शाळेला भेट दिला.येथील शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सेवा सुविधा व भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रदान केला आहे. १००८ स्वामी राघवं चैतन्य महाराज यांचे हे दातृत्व बघून रूढीकर भारावले तर हि फक्त आर्थिक मदत नसून, ग्रामीण भागातील शिक्षणावरील त्यांचे प्रेम, बांधिलकी आणि समाजातील बालकांच्या सर्वांगीण उद्धाराची खरी जाणीव आहे. या भरीव देणगीमुळे शाळेत शैक्षणिक व भौतिक सुविधा उभारण्यात मोठी मदत होईल आणि त्यामूळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले ज्ञानार्जन करण्यासाठी चांगले वातावरण लाभेल. यावेळी रूढी जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि सर्व रूढी ग्रामस्थांच्या वतीने हभप. १००८ स्वामी राघव चैतन्य महाराज यांचे या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी स्वामीजींचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन करण्यात आले. शिक्षणासाठी दिलेली देणगी म्हणजे समाजाच्या भविष्यासाठी दिलेला सर्वात मोठा हातभार आहे. अशी भावणा अनेकांनी या वेळी व्यक्त केली. लोकसहभागातून प्रगतीकडे साहचर्यातून समृद्धीकडे या म्हणीतील वाक्यांचा अर्थ आज सर्वांना अनूभवता आला.*🚩🌸🌸⛎♓*
byMEDIA POLICE TIME
-
0