ढग फुटी व अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, हेक्टरी 50 हजार मदत करा -शंकर महाजन यांची मागणी. (मारोती एडकेवार नांदेड ज़िल्हा /प्रतिनिधी नांदेड : ) नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर व बिलोली तालुक्यात ढग अतिवृष्टीच्या,पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करा. वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन, यांची ई-मेल द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी.18 ऑगस्ट पासून जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे,अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहेत, तर तसेच मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे रावणगाव हसणाळ येथे मोठे संकट आले आहे व लेंडी नदीचे पाणी,व तेलंगाना येथील निजामसागर धरणाचे 7 दरवाजे उघडल्यामुळे, मांजरा नदी पात्रात खूप मोठा पूर आला आहे,नदीपात्रा शेजारी असलेले गावे, सगरोळी,बोळेगाव, गंजगाव, येसगी, कारला, माचनूर, हुंगूनदा,नागणी, केसराळी, हिप्पारगा थडी, रामपूर,दौलतापूर, तसेच इतर गावचे, हजारो हेक्टर जमीन तीन दिवसापासून पुरातच बुडून आहे, शेतकरी बांधव, मोठे अस्मानी संकटात सापडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना, लवकरात लवकर पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्या,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यांनी ईमेलद्वारे, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांकडे केली आहे,व तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांचे मंजूर करण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावे,असे निवेदनात म्हटले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0