हिप्परगा थडी येथे डॉ.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिकाचे काम प्रगतीपथावर .. (मारोती एडकेवार नांदेड जिल्हा/प्रतिनिधी)नांदेड : नांदेड जिल्ह्यातील डीजे मुक्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, जयंती बिलोली तालुका हिप्परगा थडी येथे लोकवर्गणीतून होत, असलेले डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयाचे काम,प्रगती पथावर आले आहे. हिप्परगा थडी येथे डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, डीजे न लावता पैशाचा अनर्थ खर्च न करता,समाजातील विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासिका व वाचनालयाची, समाजातील वर्गणी,व लोकवर्गणीतून उभारण्यात आले.यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मंडळ, हिप्पारगा थडी यांचं सर्वांकडून कौतुक होत आहे. हिप्परगा थडी येथे मातंग समाजातील, एडकेवार व अंजनीकर या परिवारातील तरुण कार्यकर्ते,व समाजसेवक यांनी, अभ्यासिका निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत असून,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले विचार,शासनकर्ती जमात बनणे हा विचार समाजात रुजवणे, व विद्यार्थी घडवणे, हा उद्देश उराशी बाळगून,डीजे मुक्त व वाचनालयाची निर्माण करून जयंती साजरी करण्यात येत आहे,दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे. तरी हा उपक्रम लोकवर्गणीतून,होत असलेली अभ्यासिका व वाचनालय यांना शिक्षणप्रेमी व बहुजन विचारवादी,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, व नेते यांनी, आर्थिक मदत व पुस्तकांची मदत करत आहेत, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती मंडळ हिप्परगा थडी यांच्याकडून, शिक्षणप्रेमी व आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांना, विनंती करण्यात येते की,नांदेड जिल्ह्यातील ही पहिलाच जयंती सोहळा आहे जो,डीजे मुक्त,व नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतले आहे, त्यामुळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, व नेते यांनी अभ्यासिका व वाचनालयासाठी आपले,योगदान असावे असे जयंती मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती मंडळ हिप्पारगा थडी, यांचं अभिनंदन. आणि त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीच्या शुभेच्छा,असे शिक्षण प्रेमी यांच्याकडून मिळत आहेत.

हिप्परगा थडी येथे डॉ.लोकशाहीर  आण्णा भाऊ साठे अभ्यासिकाचे काम प्रगतीपथावर ..                                           
Previous Post Next Post