*जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचा संघ नाट्यस्पर्धेत प्रथम* (मानवत / वार्ताहर)🌸*मानवत बालरंगभूमी परिषद आयोजित *‘इतिहास महाराष्ट्राचा’* या विषयावरील नाट्यस्पर्धेत जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवत रोडच्या नाट्यसंघाने चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून येत्या २३ व २४ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेसाठी विद्यालयाची निवड झाली आहे.या स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने अर्जुन भिसे यांचे लेखन व राजू वाघ यांचे दिग्दर्शन असलेले *“स्वराज्यातील स्त्री सन्मान”* हे लक्षवेधी नाटक प्रभावीपणे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्रीविषयक विचारांची झळाळी मंचावर प्रभावीपणे मांडत त्यांनी प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली.या नाट्याविष्कारात कु.प्रणाली वाघमारे,कु. प्रणिती गरड, कु.आर्या भोसले,कु धनश्री पायघन, कु.अपेक्षा वीरकर, कु.अक्षरा भाले,कु सुप्रिया लव्हाळे, कु .श्रेया हरकळ,कु. रोहिणी वीरकर आणि कु. मयुरी इंगळे या विद्यार्थिनींनी जीवंत अभिनय करून नाटकाला विशेष उंची दिली.विजयी संघाचे मुख्याध्यापक प्रा. नितीन लोहट सर, पर्यवेक्षक सुरेश भिसे सर, विभागप्रमुख रामजी तळेकर सर, डी. के. गाडगीळे सर व कौशल पामे सर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे श्रीमती अंजली गिराम मॅडम आणि , अर्चना कोतावर मॅडम यांचे अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.🌸💐🌸💐🌸💐🌸💐

जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचा संघ नाट्यस्पर्धेत प्रथम*     
Previous Post Next Post