कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे सरांचा भव्य सन्मान. (बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.रामतीर्थ :)सन्माननीय श्री. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे साहेब यांनी आपल्या कार्यकुशलतेने, प्रामाणिकपणे व जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे समाजात पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या तर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यकाळात गुन्हेगारी रोखण्यासाठी, शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तसेच कायद्याचे पालन होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे धाडसी, कर्तव्यदक्ष व पारदर्शी कामकाज हे संपूर्ण पोलीस विभागासाठी प्रेरणादायी ठरत आहे. “खऱ्या अर्थाने समाजाची सेवा हीच खरी देशसेवा आहे” या ध्येयवाक्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे साहेब यांनी केलेल्या सेवेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सर.

कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे सरांचा भव्य सन्मान.                                                         
Previous Post Next Post