अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे, घरपडीचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत करा ,मिनल पाटिल खतगावकर. (आंनद करूडवाडे ग्रामीण प्रतिनिधि नांदेड )नांदेड : जिल्ह्यात चार दिवसापासून (१५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट) सतत होत असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतात पाणी शिरल्यामुळे शेतात उभे असलेले सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापुस आदी पिके पाण्याखाली गेली असून पुर्णतः आडवी पडली असून जमीनही खरडून गेली आहे. नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारीमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी केली निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीराहुल कर्डिले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे नदी-नाल्यांना पुर आला असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. शेतातील उभे पीके पाण्याखाली व खरडून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे. कांही गावातील घरात पाणी शिरल्यामुळे घरांचे व जीवनावश्यक साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांही तालूक्यात नदी-नाल्यांचे पाणी शिरुन व अतिवृष्टीमुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे, अतिवृष्टी झालेल्या प्रत्येक गावातील बाधित शेतीचे, घरांचे व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे सर्व्हेक्षण करुन मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0