"सन्मान नवदुर्गाचा" कार्यक्रमात महिला शिक्षिका दिपालीताई सावंत यांचा गौरव . (प्रतिनिधी वर्धा ग्रामीण विपुल पाटील )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशच्या रूपालीताई चाकणकर व जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शहारे यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादीतर्फे "सन्मान नवदुर्गाचा" ही कार्यक्रम राबवण्यात आली. त्यात महिला शिक्षिका दिपालीताई सावंत (शेकापूर बाई, हिंगणघाट) यांचा सत्कार झाला. दिपालीताईंना तीन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले: 1) डॉक्टर कुमुद बनसोड गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023 2) शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024 3) मुख्यमंत्रीच्या "शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद" कार्यक्रमात विशेष उल्लेख.कार्यक्रमाला हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष दिनेश भाऊ गुजरकर, प्रदेश सचिव मंगलाताई भंडारी, शहराध्यक्ष अनिशाताई मान, जिल्हा परिषद माजी सभापती शरयू ताई वांदिले आणि शिक्षक, पालक उपस्थित होते. दिपालीताईंचे हे गौरव स्वागतार्ह असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान दाखवले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0