चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मभूषण पुरस्काराने जी.पी.मिसाळे सन्मानित. (धर्माबाद प्रतिनिधी (गजानन वाघमारे) येथील फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीतील असीमनिष्ठा, त्याग व निष्काम वृतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धम्म चळवळ, विविध आंदोलन व पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देऊन व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा उमटविणारे आदर्श शिक्षक, एन.सी.सी. ऑफिसर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले जी. पी. मिसाळे सर यांना बुद्धिस्ट रिसर्च फाउंडेशन नांदेड च्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मभूषण" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षकागृहात भव्य दिव्य कार्यक्रमात दि.15 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत पैय्याबोधी थेरो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल सावंत, किशोर भाऊ भवरे, बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ. बालाजी कोम्पलवार यांची उपस्थिती होती. मुख्य आयोजक कॉम्रेड गणेश शिंदे, कोंडदेव हटकर, डॉ.राम वनंजे, सा.ना.भालेराव, प्रज्ञाधर ढवळे, प्रभू ढवळे, कु.सुमेधा हटकर यांनी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष काटकांबळे यांनी केले तर आभार इंजिनीयर विवेक मवाडे यांनी मानले. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे "देवानंपिय अशोक" या दोन अंकी नाटकाचा प्रयोग दाखविण्यात आला. अप्रतिम असे नाटक नांदेडकरांना पहावयास मिळाले.

चक्रवर्ती सम्राट अशोक धम्मभूषण पुरस्काराने जी.पी.मिसाळे सन्मानित.                                                     
Previous Post Next Post