बिलोली येथे19 सप्टेंबरला मातंग, समाजाचे जेलभरो आंदोलन. ( मारोती एडकेवारजिल्हा /प्रतिनिधी नांदेड नांदेड : मातंग समाज आक्रमक, बिलोली येथे,आरक्षण उपवर्गीकरणासाठी 19 सप्टेंबर रोजी,लोकस्वराज्य आंदोलन व मातंग समाज वतीने जेलभरो आंदोलन.अनुसूचित जातीचे वर्गीकरण, करून मागासलेपणाच्या आधारे त्यांच्या जातीसाठीचे, आरक्षण निश्चित करण्यासाठी,सर्वोच्च न्यायालयाने उप वर्गीकरण संदर्भात निर्णय दिले आहे, परंतु महाराष्ट्र शासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे, आता लोकस्वराज आंदोलनाच्या वतीने बिलोली येथे, 19 सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा,निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.मातंग समाजात उपजाती वर्गीकरणाची मागणी,अनुसूचित जाती एसी आरक्षणातील काही विशिष्ट समूहाच्या,मागासलेपणा दूर करण्यासाठी,त्यांना समान न्याय देण्यासाठी, न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय राज्यात लागू करण्यासंदर्भात समिती नेमली होती, आणि तीन महिन्यात अहवाल देण्यात सांगितले, होते परंतु समितीची मुदत 15 जानेवारीला संपली पण,या मुदतीत सहमतीने अहवाल सादर केला नाही, केवळ आंतरिम अहवाल सादर केला आहे.महाराष्ट्र सरकार याकडे,जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे, समाजाचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता मातंग समाज, आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.म्हणून येत्या 19 तारखेला,बिलोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत,जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचये लोकस्वराज्य आंदोलन ची बिलोली तालुका कमिटीने,दिला आहे. यावेळी उपस्थित गंगाधर भंडारे, तालुका अध्यक्ष गंगाधर शिल्लोन, यादव कुरकेकर, सतीश कुडकेकर, रमेश गाडेकर, प्रकाश आंबेकर,मारोती दुमटकर,गंगाधर डोंगरे,बालाजी एलगंदरे,हनुमंत शिंदे, चंद्रकांत कुडके, सह आदींनी निवेदनावरील सह्या केल्या.
byमीडीया पोलीस टाईम
-
0