पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवशी आ.अमोल जावळें याच्या पुढाकारातून पदाधिकाऱ्यांनी केले बामणोद–हंबर्डी रस्त्याचे भूमिपूजन.सामुदायिकरित्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रामस्थांनी केले कौतुक. यावल दि.१७ ( सुरेश पाटील )दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बामणोद–हंबर्डी या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक रित्या मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत केल्याने या नवीन राजकीय प्रथेची ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. भारताचे यशस्वी व कणखर पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच “सेवा पंधरवडा” च्या पहिल्या दिवशी या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रावेर विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय तळून तडफदार आमदार अमोल दादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार करण्यात आले.स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली.गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.खड्ड्यांनी भरलेल्या मार्गामुळे ग्रामस्थांना दैनंदिन, प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता..या विकासकामामुळे परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून हा रस्ता जीवनवाहिनी ठरणार आहे.आमदार अमोलभाऊ जावळे यांनी या प्रश्नाचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या रस्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आणि आज भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष साकारला गेला.या सोहळ्याला शेतकरी, ग्रामस्थ,महिला,युवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हिरालाल चौधरी, शरददादा महाजन,प्रभाकर सोनावणे,डॉ.नरेंद्र कोल्हे,भरत महाजन,डॉ.जे.डी.भंगाळे,नितीन चौधरी,प्रभाकर सरोदे,आलिशान तडवी,पिंटू तेली,योगराज बऱ्हाटे, उमेश पाटील,नारायण चौधरी, दीपक चौधरी,सागर कोळी,उमेश बेंडाळे,गुणवंत निळ,अमोल वारके, प्रशांत सरोदे,जयश्री चौधरी,लता मेढे,पूजा पाटील,डालू चौधरी,भरत पाटील,ज्ञानेश्वर तायडे,सुपडू नेहते, मच्छिन्द्र चौधरी,चंद्रकांत तळेले, अनंता फेगडे,अण्णा भोळे,कुणाल सोनावणे,प्रकाश वाघुळदे,युवराज सोनावणे,नरेंद्र चौधरी,सतीश चौधरी,सुनील चौधरी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.“प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवशी आ.अमोल जावळें याच्या पुढाकारातून पदाधिकाऱ्यांनी केले बामणोद–हंबर्डी  रस्त्याचे भूमिपूजन.सामुदायिकरित्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रामस्थांनी केले कौतुक.                                                                             
Previous Post Next Post