*सत्कार सोहळा व अर्थसहाय्य वितरण कार्यक्रम संपन्न**महीला बचत गटांना अकरा लाखांचे अर्थसहाय्य वितरण**महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल :रवींद्र शिंदे*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.25:- विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. माढेळी यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. अध्यक्ष मा. रविंद्र शिंदे तसेच बँकेचे संचालक श्री जयंत टेमुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रकाशचंदजी मुथा (माजी सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर) सोबतच विशेष अतिथी मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर (खासदार, चंद्रपूर-आर्णी लोकसभा) यांच्यासह चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री जयंत टेमुर्डे, माढेळी सरपंच श्री देवानंदजी महाजन, सहा. निबंधक सहकारी संस्था वरोरा तालुका श्रीमती सिंधू मॅडम तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री राजेश देवतळे, सौ. कल्पणाताई टोंगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या माढेळी शाखोव्दारे तथागत महिला बचत गट माढेळी, जयसेवा महीला बचत गट बामर्डा, सितामाता महिला बचत गट वाघनख, श्री साई स्वयम सहाय्यता महिला बचत गट आशी तसेच एकता महिला बचतगट बामर्डा अशा ५ महिला बचत गटांना एकूण अकरा लाखांचे अर्थसहाय्य वितरण करण्यात आले.या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल देवतळे, उपाध्यक्ष श्री प्रकाश वाळके, सचिव श्री बोबडे यांच्या मार्गदर्शनात संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0