*शेतकऱ्याची कर्ज माफी ऐवजी उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी अगोदर का*??? आजची परिस्थिती पाहता प्रत्येकाला शेतकऱ्यांचा जन्म नकोसा झालाय कारण निसर्गानं ज्या वर्षी पुरेपुर साथ दिली त्या वेळी सरकार हमीभाव देत नाही, कधी कधी तर पावसाळा कोरडा जातो त्यात दुबार पेरणीच संकट, नांगरणी, खुरपणी, पाळी मारणे ह्याचा सुद्धा खर्च निघत नाही. ज्या वर्षी पिक चांगली येतात त्या वेळी शेतकरी थोडीफार स्वप्न पाहत असतो ती स्वप्न पण निसर्गाला देखवत नाहीत मध्येच नजर लावतो आहे ते हिरावून घेतो.. कित्येक शेतकरी ह्या पावसाच्या मातीच्या भरोसा धरून कर्ज घेऊन हाय तेवढं मातीत ओतुन देतात त्या आधारावर गेल्या वर्षी पोरीच लग्न केलेलं रिन फेडाव अन् त्यातून मोकळं व्हावं एकदाचं, शाळेत पोराची फिस सावकारकून व्याजी घेतली ती फेडावी एकदाची, मध्येच न सांगता आलेली आपत्कालीन परिस्थिती दवाखान्यात झालेला खर्च बरच काही. ते पण देखवत नाय ह्या पावसाला निसर्गाला तो पण साथ देत नाही हिरावून घेतो सगळा आनंद, सगळी स्वप्न, हातात आलेलं पिक, हातात आलेलं, लेकरू, गायी, म्हशी गोठे पण..... एवढं सगळं करून हातातुन सगळं निसटून गेल्यावर शेवटी राहतो त्या शासनाच्या भरोश्यावर काही मदत होईल ह्या वर्षी गेलं पुढच्या वर्षी तर व्यवस्थित होईल म्हणून.. तेच शासन हातात शेतकऱ्याच्या भल मोठ गाजर देत.. प्रवृत्त करत आत्महत्या करायला... किमान जगण्यापुरत तरी भेटायला हवं. आज सोयाबीनची बॅग,खत पोत असेल, फवारणी औषध असेल, खुरपण असेल, बैलाची हजेरी , ट्रॅक्टर असेल तर त्याची हजेरी, पाळी मारायची तर त्याची किंमत ह्या पैकी एखाद्या गोष्टीची किंमत पण देत नाय. जेवढी देत त्याची जाहिरात त्याच्या चार पट करत.. खरंच हा देश कृषिप्रधान देश आहे? अस वाटण स्वाभाविक की .. शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा हवसे, गवशे, नवशे सगळे एकत्र जमतात, त्या वेळी आलिशान गाडीतुन आमदार, खासदार, मंत्री उतरतात त्या वेळी सुद्धा त्याच्या कुटुंबाला आश्वासनच देऊन जातात.. त्याच्या लेकरांच्या, कुटुंबाच्या रडण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून सहानुभूती निर्माण करून आपला मतदार संघ कसा व्यवस्थित राहील ह्याची जेवढी काळजी घेता तेवढी शेतकऱ्यांची घेतली तर तुमच्या बापाचं काय बिघडत राजकारणी लोकहो.. जो पैसा देत आहात त्यात तुमच्या कोणत्या मेहनतीवर देत आहात म्हणुन बोलुन दाखवता?? शेतकऱ्यांच्या पदरात व्यवस्थित असेल तर तो तुमच्या दारात कशाला येईल ह्याची पण जाणीव नाही होत ह्या हरामी भक्षकाला?? देश कृषिप्रधान आहे तर शेतकऱ्याची कर्ज माफी ऐवजी उद्योगपतींची हजारो लाखो करोडोची कर्जमाफी अगोदर का?? शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणार शासन जेव्हा बळीराजा खुप अडचणीत आहे तेव्हा त्याच्या शेतजमिनी बळकावून घेण्याचा अठ्ठास का?? शक्तिपीठ महामार्ग विरोध असताना एवढा अठ्ठास का? कमी भावात धरणासाठी जमिनी घेतल्या हा अन्याय नाही का ? अनेक प्रकल्पग्रस्त भुमीहीन झाले, तरूण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक बेरोजगारांचा आक्रोश ह्या सर्व गोष्टीला आळा घालायचं असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्याही दलाल नेत्यावर, तो शेतकरी नेता म्हणून पुढे आलेलाही असेल तरी कोणाच न ऐकता फक्त दोन वर्ष आपल्याला, आपल्या कुटुंबाला जेवढं लागेल एवढंच पिकवा मग समजेल कशी आयात, निर्यात करतात..
byमीडीया पोलीस टाईम
-
0