**पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढ दिवसा निमित्त रूग्णांना फळ वाटप. (*मानवत / वार्ताहर.)————————पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना व वयोवृद्धांना फळे वाटप करण्यात आले.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट परभणी जिल्हा कार्यकारणी व मानवत रोड रेल्वे स्टेशन प्रवासी प्रकोष्ठ यांच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. परभणी जिल्हा कार्यकारणीचे सहसंयोजक के.डी.वर्मा यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वृंद, मानवत तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश काबरा, कृष्णा बाकळे,प्रकाश करपे,मानवतरोड रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ चे सदस्य नाथभजन.हे उपस्थित होते.मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत व पाथरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ओमकार वृद्धाश्रमातही तेथील वयोवृद्धांनाही फळे वाटप करण्यात आली.यावेळी भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ जिल्हा कार्यकारिणीचे सहसंयोजक के.डी.वर्मा व प्रकाश करपे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0