दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर महापुर, शेतकरी व कामगारांवर संकट. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड ). नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये पुराचा तडका, बिलोली तालुक्यातील,सगरोळी सर्कल मध्ये मनाड नदीला तिसऱ्यांदा महापुर, हिप्परगा थडी येथे मोठ्या प्रमाणात महापूर परिस्थिती निर्माण झाली. दसरा दिवाळीच्या,तोंडावरती महापूर आल्यामुळे शेतकरी व कामगारांवरती, मोठे संकट निर्माण झाले आहे.सगरोळी सर्कल मधील, सगरोळी, हिप्पारगा थडी, दौलतापूर,बोळेगाव, रामपुर थडी, केसराळी,खतगांव,या गावात महापुराने मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे,त्यातच सगरोळी सर्कलमधील हिपरगा थडी,या गावातील 75 टक्के नागरिक कामगार असून त्यांच्या वरती, दसरा दिवाळी सणाच्या पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे, सोयाबीन सारख्या पीक काढणीच्या कामामुळे त्यांना चांगले रुपये मिळाले असते पण सोयाबीन हा भुईसपाट झाल्यामुळे, शेतकऱ्यांसोबतच कामगारांची सुद्धा बेहाल झाली आहे. सततच्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक घरांना चिऱ्या पडून भिंती कोसळले आहेत. शासनाने आतापर्यंत कोणतीही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसून,व कामगारांना तर कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. ज्यांचे घरे ढासाळले असे सर्वांचे, पंचनामे सुद्धा झालेले नाही, तरी सर्व शेतकरी व कामगार यांचे शासनाला विनंती आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना, प्रभावीपणे राबवून तात्काळ घरकुल मंजूर करतील का? व कामगारांसाठी दसरा दिवाळी सणासुदी च्या सरकारने मदत करतील का? व शेतकऱ्यांना मदत होईल का? अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या मनामध्ये ढवळत आहेत, पूर परिस्थिती शेतकरी व रोजदारी करून आपलं जीवन जगणारे कामगार, या सर्वांना या महापुराने पूर परिस्थितीमुळे संकटाचे मोठे डोंगर उभे राहिले आहे,यामुळे शासन लवकर पाहूल उचलून, पंचनामे करून ताबडतोब मध्ये, मदत जाहीर करावी.असे सर्व शेतकरी व कामगारांमधून होत आहे. मी मीडिया पोलीस टाइम प्रतिनिधी नांदेड जिल्हा मारोती एडकेवार, मीडिया पोलीस टाइमच्या माद्यमातून शासनास विनंती करतो की हिप्पारगा थडी,येथील कामगार वर्ग शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी,व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना प्रभावीपणे राबवून घरे बांधून देण्यात यावे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0