*तालूक्यातील अस्माणी संकटात सापडलेल्या गावाचा पालकमंत्री यांनी केला दौरा.*. (मानवत / वार्ताहर.(अनिल चव्हाण } ९५२७३०३५५९ ) *——————————————**मानवत* तालूक्यातील गोदा पट्यातील रामपूरी,थार,वांगी, कुंभारी ,सह अनेक गावा मध्ये अतिवृष्ठीने मोठे नूकसान केले *गोदा व दूधना* पट्यातील शेतातील ऊभ्या पिकांचे मोठे नूकसान झारे त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज परभणी जिल्हाच्या *पालकमंत्री* ना. मेधना दिपक साकोरे, बोर्डिकर यांनी प्रत्येक्ष अतिवृष्ठी मध्ये सापडलेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन पाहणी केली. यावेळी तात्काळ पंचनामे करून नूकसान भरपाई देण्यासाठी सूचना केल्या.यावेळी दौर्‍यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालिका प्रेरणाताई वरपूडकर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे भाजपा मानवत तालूका मंडलाध्यक्ष हरिभाऊ निर्मळ, भाजपा महामंत्री दादासाहेब भोरकडे, भाजपा मानवत शहरमंडलाध्यक्ष संदीप हंचाटे, भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर धोपटे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्गाताई जाधव परमेश्वर पाटील किसान मोर्चा तालुकाध्यक्ष, विद्यार्थ्यांनाथ घागरे तालुकाध्यक्ष यांच्यासह अस्माणी संकटात सापडलेले शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. ***

तालूक्यातील अस्माणी संकटात सापडलेल्या गावाचा पालकमंत्री यांनी केला दौरा.*.                                                     
Previous Post Next Post