*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट निवेदन: ओला दुष्काळावर मदतीसाठी मागणी -( पुलगाव तहसीलदारांना निवेदन सादर* ()वर्धा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाने पुलगाव तहसीलदारांना ओला दुष्काळाबाबत निवेदन दिले. स्नेहा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या वेळी देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष तुषारभाऊ वाघ, संगठक दिलीपभाऊ मेश्राम, माहासचिव अमोलभाऊ येसनकर, सरचिटणीस गोपालजी पाटील, तालुका सचिव विपुलभाऊ पाटील, नाचणगाव सर्कलचे स्नेहलभाऊ येसनकर, पुलगाव शहर अध्यक्ष हिटलर हुमने आणि आकाश भाऊ पाटील उपस्थित होते.ओला दुष्काळामुळे खासकरून सोयाबीनसह इतर अनेक पिकांची थोड्या पावसामुळे नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत आणि योग्य तोडगा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानभरपाई त्वरित देण्याची, विशेष मदत पॅकेज राबविण्याची आणि पिकविमा योजना प्रभावी करण्याची विनंती करण्यात आली आहे.कार्यक्रमात शेतकरी कुटुंबांच्या हितासाठी सरकारकडून वेगवान पावले उचलण्याची कळकळीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट निवेदन: ओला दुष्काळावर मदतीसाठी मागणी -( पुलगाव तहसीलदारांना निवेदन सादर*                                                     
Previous Post Next Post