यावलला विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी. (यावल दि.१७ ( सुरेश पाटील ) आपल्या नैसर्गिक,कलात्मक सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा दिनानिमित्त यावल येथील फालकनगर बसस्टँड वरील भगवान विश्वकर्मा फलकावरील प्रतिमेस कारागीर बांधवांनी पुष्पहार अर्पण करून श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी भगवान विश्वकर्मा यांनी केलेल्या सृष्टी निर्माण कार्याचा परीचय दिला.याप्रसंगी चेतन अढळकर यांनी विश्वकर्मा यांना नमन करून सांगितले की, विश्वकर्मा हे दैवी शिल्पकार आहेत विश्व निर्माते म्हणून त्यांची ओळख आहे सर्व कौशल्य संपन्न असल्याने विविध क्षेत्रातील कारागीर , शिल्पकार यांचे ते पुजक आहेत.म्हणूनच विश्वकर्मा जयंती दिनी विविध कार्यशाळा,यंत्रसामग्री आणि अवजारांची पूजा केली जाते, असे मानले जाते की विश्वकर्मां यांची जे कारागीर पुजा करतात त्यांना कौशल्य प्राप्त होवून ते उत्कृष्ट कारागीर म्हणून ओळखले जातात.भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे पहिले शिल्पकार आणि अभियंता मानले जातात.त्यांनी अल्पावधित कृष्ण द्वारका हे पवित्र शहर वसवले आणि देव- देवतासाठी त्यांनी अनेक भव्य रचना केल्याचे मानले जाते.त्यांनी 'विश्वकर्मा वास्तुशास्त्र ' या ग्रंथाची रचना केल्याचे आढळकर यांनी सांगितले.याप्रसंगी शेखर बाविस्कर,चेतन सपकाळे,मनोज महेश्री,नितिन बोरोले,चंद्रकांत बारी, निलेश देवरे,यांचेसह समाजबांधव, विविध क्षेत्रातील कारागीर उपस्थित होते.

यावलला विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.       
Previous Post Next Post