नागपूर येथील कार्यालयासमोर घरकुलासाठी फासेपारधीबांधवांचा आत्मदहनाचा इशारा*** वाशीम, ११ सप्टेंबर कुडाच्या व ताटव्याच्या घरात राहणाऱ्यांना ग्रामीण ग्रुप कार्यक्रमांतर्गत जागेचा आठ अ व हक्काचे घरकूल मिळावे या मागणीसाठी मालेगाव तालुक्यातील ग्राम वसारी येथील फासेपारधी नागरिक व महिलांना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील कार्यालयासमोर श्वास कोडून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत उज्वला शकू पवार व इतरांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम वसारी येथील सरकारी गावठाण शेत सर्वे नं. १३८ मधील जमिनीवर आमचे कुडामातीचे व ताटव्याची घरे आहेत. सदर जागेचा नमुना १ ईची रक्कम व १९९५-९६ चा शासकीय पुरावा व दंडाच्या पावत्या आमच्याकडे आहेत. तसेच वर्ष २०११-१२ च्या कर भरल्याच्या पावत्या आहेत. या जागेचा आठ अ मिळण्यासह घरकुल मागणीसाठी १६ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली आहेत. शासन निर्णयानुसार राज्यातील बेघर तसेच कच्या घरात राहणान्या पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजे. घरकुलाच्या मागणीसाठी ९ जानेवारी २०२४ रोजी आजाद मैदान मुंबई येथे दिलेल्या आत्मदहनाच्या इशान्यानंतर पं.स. मालेगावचे गटविकास अधिकारी यांनी घराच्या आठ अ साठी एक महिन्याचे लेखी आश्वासन दिले होते. केवळ तोंडी आश्वासने देवून तहसीलदारांनी आमची वेळोवेळी दिशाभूल केली. त्यामुळे या मागणीसाठी येत्या २३ सप्टेंबर रोजी राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर श्वास कोडून आत्मदहन करण्याचा इशारा उज्वला पवार व इतर फासेपारधी समाजाचे पुरुष व महिलांनी दिला आहे. निवेदनावर उज्वला पवार, लता पवार, रेणुका भोसले, गिता चव्हाण, लता पवार, शोभा भोसले, वंदना पवार, निर्मला चव्हाण, कांता पवार, गुणवंता भोसले, वनिता भोसले, प्रियंका चव्हाण, गंगा पवार, रामा भोसले आदींच्या सह्या आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0