*मॅथ्स ओलंपियाडमध्ये रूढी शाळेचे दैदिप्यमान यश*. (मानवत / वार्ताहर.{ अनिल चव्हाण }——————————————मॅथ्स ओलंपियाड 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळा गुणवत्तेचा गौरव वाढवलेला आहे. परभणी येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात रूढी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तर नीता भुसारे हिने कॉम्प्युटर विजेतेपद तर वैष्णवी होंडे आणि आराध्या शेवाळे यांनी सायकल विजेतेपद पटकावले. यावेळी शाळेतील नऊ विद्यार्थ्यांनी स्मार्ट वॉच विजेतेपद तर वीस विद्यार्थ्यांनी ट्रॉफी विजेतेपदास गवसणी घातली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील रुढीच्या शाळेने जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यां सोबत स्पर्धा करीत बक्षिसांचे प्रथम पारितोषक मिळवत आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटवला आहे. शालेय जीवनातच ऑलिंपियाड सारख्या परीक्षांचे अनुभव देत भविष्यवेधी स्पर्धा परीक्षांचे स्वप्न साकारण्यासाठी दमदार पाया भरणी रूढी शाळेत होत असल्याचे दिसून येत आहे. मॅच ओलंपियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी उमाकांत हाडोळे व रोहिणी खोंडे यांनी पुढाकार घेतला . मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार केला आहे. शाळेच्या गौरवपूर्ण यशासाठी मुख्याध्यापक बाळू घनचक्कर , शिक्षक निर्मला घारोळे , रामकिशन भालेराव , किरण तापडिया, एकनाथ रापेल्लीवार , विशाल घाटुळे यांचे अभिनंदन करण्यात आले . यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू होंडे , उपाध्यक्ष सुरेश होंडे , लक्ष्मण निर्वळ , बालासाहेब निर्वळ , बालाजी होंडे , काशिनाथ पतंगे , ज्ञानेश्वर बोंबले , नामदेव मोगरे , विष्णू निर्वळ , दत्ता निर्वळ , पिंटू निर्वळ , मुसाभाई शेख , प्रकाश होंडे , विलास होंडे , रामेश्वर होंडे , वैजनाथ होंडे , बाबासाहेब मुळे , दादाराव होंडे , अंगणवाडी कार्यकर्ती सविता काकडे व सीमा कीर्तनकार आदींनी कौतूक करून अभिनंदन केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0