साहेबराव अंजनीकर यांची भाजपा झोपडपट्टी सेल नांदेड जिल्हा, संयोजक पदी निवड. (मारोती एडकेवार नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आले, त्यात बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी चे माजी सरपंच प्रतिनिधी,व मातंग समाजाचे नेते ,भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत ग्रामीण भागातील नेते, साहेबराव पिराजी अंजनीकर,यांची भाजपा झोपडपट्टी सेल नांदेड जिल्हा संयोजक पदी, निवड करण्यात आली. नांदेड जिल्हा अध्यक्ष दक्षिण, संतुकराव हंबर्डे व राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे,खा.अशोकराव चव्हाण साहेब, देगलूर बिलोली विधानसभा चे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, यांनी त्यांच्या कार्याचा आढावा दखल घेऊन,भारतीय जनता पार्टी भाजपा झोपडपट्टी सेल नांदेड जिल्हा संयोजक पदी, त्यांची निवड करण्यात आली. साहेबराव पिराजी अंजनीकर, हे धडाडीचे कार्यकर्ते, व सामाजिक नेते असून, हिप्परगा थडी चे माजी सरपंच प्रतिनिधी,व गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठ कार्यरत आहेत, त्यांच्या या निवडीमुळे सर्व हिप्परगा थडी गावातील नागरिक,व सामाजिक कार्यकर्ते पत्रकाराकडून,त्यांना पुढील वाटचालीच्या, हार्दिक शुभेच्छा.व त्यांचं कौतुक होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0