*आई रेणुका चिवडा सेंटरला पत्रकार संघाची भेट....** कच्चा चिवड्याच्या पारंपरिक चवीचे व दर्जेदार गुणवत्तेचे पत्रकारांकडून कौतुक; देवळीहून विदर्भभर गाजलेला खास ब्रँड.. (वर्धा जिल्हा प्रतिनिधी :(अब्दुल कदिर) वर्धा जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देवळी येथील सुप्रसिद्ध आई रेणुका चिवडा सेंटरला अलीकडे भेट दिली. या भेटीदरम्यान पत्रकारांनी खास बनवलेला कच्चा चिवडा आस्वाद घेतला आणि त्याच्या गुणवत्तेचे व पारंपरिक चवीचे कौतुक केले. यावेळी आई रेणुका चिवडा सेंटरचे संस्थापक अशोक पारीसे, मार्गदर्शक पत्रकार रविंद्र पारीसे व पवन पारीसे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यांच्या हाताने तयार होणाऱ्या कच्चा चिवड्याच्या चवीबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले. पत्रकार संघाचे अब्दुल कदिर, अमोल ठाकरे, अमोल येसनकर, विपुल पाटील, तुषार रेड्डीवार व आशिष जांचक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने सांगितले की – “वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात इतक्या स्वादिष्ट कच्चा चिवड्याचा आस्वाद दुसरीकडे मिळत नाही. आई रेणुका चिवडा सेंटर हा दर्जेदार व पारंपरिक चवीचा खरा पत्ता आहे.”विविध उत्पादनांची उपलब्धता :कच्चा चिवड्यासह येथे चिवडा बनवण्याचे साहित्य, ब्रेड, फिंगर, पापड, चिक्की, पाणीपुरी, करेला जाम, पत्रावळी, पाणी ग्लास, चहा ग्लास, भाजी ड्रोन, नाश्ता प्लेट आदी अनेक उत्पादने ठोक व चिल्लर स्वरूपात उपलब्ध आहेत. देवळी शहरासह संपूर्ण परिसर आणि वर्धा जिल्ह्यात आई रेणुका चिवडा सेंटरने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. येत्या काळात हा ब्रँड आणखी लोकप्रिय होईल, असा विश्वास पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लग्न, पार्टी, स्वागत समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांसाठी चिवडा व इतर पदार्थांची ऑर्डर येथे घेतली जाते.संपर्क – प्रा. रविंद्र पारीसे : 8007457677, प्रा. पवन पारीसे : 9764717396पत्रकारांचे मनोगत :-अब्दुल कदिर : चिवड्याचा स्वाद अप्रतिम आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा चिवडा आजच्या पिढीलाही आकर्षित करतो. हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवेल, याची खात्री आहे.अमोल ठाकरे : आई रेणुका चिवडा सेंटरने दर्जेदार उत्पादनामुळे ग्राहकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तेला तडा न देता व्यवसाय करणे ही मोठी जमेची बाजू आहे.अमोल येसनकर : देवळीपासून ते वर्धा जिल्ह्याच्या प्रत्येक भागात या चिवड्याची मागणी आहे. लोक याला फक्त नाश्ता नव्हे, तर खास पदार्थ म्हणून पसंती देतात. लवकरच हे उत्पादन राज्याच्या सीमेपलीकडे लोकप्रिय होईल.विपुल पाटील : आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेवर टिकणे सोपे नाही. पण आई रेणुका चिवडा सेंटरने चवीसोबत विश्वास जपला आहे. ग्राहकांना समाधान देणे हाच यशाचा मंत्र आहे.तुषार रेड्डीवार : चिवड्याची पारंपरिक चव व दर्जा टिकवणे ही या सेंटरची खासियत आहे. स्थानिक तसेच बाहेरील ग्राहक याचे नेहमी कौतुक करतात.आशिष जांचक : येथे तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनामागे मेहनत व निष्ठा आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम राहतो आणि हीच खरी ताकद आहे. आई रेणुका चिवडा सेंटरतर्फे पत्रकार संघाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानताना संस्थापक अशोक पारीसे, मार्गदर्शक प्रा. रविंद्र पारीसे व प्रा. पवन पारीसे यांनी सांगितले की, आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आई रेणुका चिवडा सेंटरने वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुढेही गुणवत्ता, विश्वास व पारंपरिक चव कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आई रेणुका चिवडा सेंटरला पत्रकार संघाची भेट....** कच्चा चिवड्याच्या पारंपरिक चवीचे व दर्जेदार गुणवत्तेचे पत्रकारांकडून कौतुक; देवळीहून विदर्भभर गाजलेला खास ब्रँड..                                                                   
Previous Post Next Post