*समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगावातील नागरिक सोयीसुविधा पासून वंचित असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे..**राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी डोंगरगाव येथे भेट देवून पुर्नवसन गावाची पाहणी केली ...*. समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव येथील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न असुन गावांतील नागरिकांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना संपर्क केला. डोंगरगाव नदीच्या जवळ असल्यामुळे नेहमी पुर येत होता म्हणून प्रशासनाने संपूर्ण गावाचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन गावातील नागरिकांना अजूनही अनेक समस्या आहेत. गावातील नागरिक वीज, रस्ते, नाली, पिण्याचे पाण्याची समस्या असून आजही नागरिकांना त्याच्या समस्यासाठी भटकंती करावी लागत आहे.आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना डोंगरगाव येथे भेट देऊन सर्व समस्या समजून प्रशासनाशी संपर्क साधून डोंगरगावातील समस्येवर तात्काळ बैठक घेण्याचे सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, प्रशांत गहुकर, सरपंच संजय वरघणे, संजय कारवटकर,खुशाल लोहकरे, नंदकिशोर धोटे, गजानन गिरडे, उमेश चंदनखेडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगावातील नागरिक सोयीसुविधा पासून वंचित असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे..**राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी डोंगरगाव येथे भेट देवून पुर्नवसन गावाची पाहणी केली ...*.                                                  
Previous Post Next Post