*वैजापूर वनक्षेत्रात अवैध सागवान तोड प्रकरण उघड – ३ आरोपी ताब्यात, १४ साग जप्त* वैजापूर (ता. २७) – वैजापूर वनक्षेत्रात गस्तीदरम्यान वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. आज रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैजापूर परिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे व रेंज स्टाफ यांनी मालापूर उत्तर कक्ष क्र. २३१ या जंगल परिसरात छापा टाकला.सदर कारवाईत काही अज्ञात इसम अवैधरीत्या सागवान वृक्षतोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना घेराव घालताच तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी तयार केलेले १४ नग सागवान लाकूड जप्त करण्यात आले असून त्याचे एकूण मोजमाप ०.५७९ घनमीटर व किंमत सुमारे ₹१३,२७५ एवढी आहे. याशिवाय आरोपींनी वापरलेली दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजित किंमत ₹४५,००० इतकी आहे.या संदर्भात वनरक्षक, मालापूर उत्तर यांनी प्रथम गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई म. निनू सोमराज मॅडम (वनसंरक्षक, धुळे प्रादेशिक), म. जमीर शेख सर (उपवनसंरक्षक, यावल), म. राजेंद्र सदगीर सर (विभागीय वन अधिकारी दक्षता, धुळे), म. एम. बी. पाटील सर (सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा), म. समाधान पाटील सर (सहाय्यक वनसंरक्षक, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि म. विकेश ठाकरे सर (वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत वैजापूर वनक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक व वाहन चालक सहभागी झाले होते.दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी जनतेस आवाहन केले आहे की, "वनक्षेत्रात कुठल्याही प्रकारची अवैध वृक्षतोड, वन्यजीव तस्करी, अवैध लाकूड वाहतूक, अतिक्रमण किंवा वनवा आढळल्यास तात्काळ शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर माहिती द्यावी."

*वैजापूर वनक्षेत्रात अवैध सागवान तोड प्रकरण उघड – ३ आरोपी ताब्यात, १४ साग जप्त*                                    
Previous Post Next Post