**शहरातील फेरी वाल्यांनी*पी.एम.स्व,निधीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करा.*©)> मुख्याधिकारी कोमल सावरे.*. (मानवत /विभागीय संपादक, {अनिल चव्हाण }———————————मानवत शहरात प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पी.एम. स्वनिधी) योजना केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पी.एम. स्वनिधी) योजना पुन्हा एकदा नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून मानवत शहरातील पात्र फेरीवाल्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य मिळणार असून मानवत नगर परिषदेच्या वतीने सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेनुसार फेरीवाल्यांना प्रथम टप्प्यात( 15 ) हजार रुपये, द्वितीय टप्प्यात ( 25 ) हजार रुपये तर तृतीय टप्प्यात ( 50 ) हजार रुपये इतके कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे छोट्या व्यवसायिक व फेरीवाल्यांना आर्थिक बळकटी मिळून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणे सुलभ होणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र फेरीवाल्यांनी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक असून, त्यानंतर त्या अर्जाची हार्ड कॉपी सर्व आवश्यक कागद पत्र यासहसह मानवत नगर परिषद कार्यालयात जमा करावी लागणार आहे. अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर कर्जाचे वितरण टप्प्या टप्प्याने करण्यात येईल.मानवत नगर परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी बोलतांना सांगितले की, “ही योजना *फेरी* वाल्यांसाठी मोठा दिलासा आहे. लहान व्यवसायांना चालना मिळावी, रोजगार टिकावा आणि आत्म निर्भरतेचा मार्ग सुलभ व्हावा यासाठी केंद्र शासनाची ही योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी ही संधी गमावू नये.”या योजनेबाबत आवश्यक मार्गदर्शन व माहिती नगरपरिषद कार्यालयातून दिली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0