उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट येथील कार्यालयाची गावठी मोहा दारू हातभट्टी वर धडक कार्यवाही* (हिंगणघाट शहर प्रतिनिधी फैमोद्दीन शेख) उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, हिंगणघाट येथील पोलीस अंमलदार यांना बातमीदाराचे मिळालेल्या माहितीवरून मौजा वाघोली शिवार येथे सुरू असलेल्या गावठी मोहा दारू हातभट्टी वर धाड टाकली असता तीन इसम नामे 1) मनोज सुधाकर दुरुगवार , रा.वाघोली 2) सुधाकर लक्ष्मण बोरकर ,रा. वाघोली , 3) मंगेश अंकुश आमनेरकर, रा. वाघोली असे रंगेहात गावठी मोहा दारू ची हातभट्टी लाऊन गावठी मोहा दारू गाळताना मिळून आले, त्यांच्या ताब्यातून जु.किं.1,85,100/- रु.चा मुद्देमाल मिळुन आल्याने, सदर माल जप्त केला. जप्त मुद्देमाल हा जागीच नाश करून आरोपीता विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक सा. श्री अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सा. यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट श्री सुशीलकुमार नायक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.हवा. अश्वीन सुखदेवे , पो.हवा चेतन पिसे, पो. हवा उमेश लडके, पो.हवा राहुल साठे, पो.हवा सतीश घवघवे, पो.ना रवींद्र घाटुर्ले यांनी केली.
byMEDIA POLICE TIME
-
0