अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदय यान निवेदन ,,,,,,,,,,,,, (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती :- आज दि 30/9/2025रोजी चंद्रपूर येते मा श्री कुंभार साहेब उपजिल्हाधिकारी अधिकारी महोदय मार्फत जिवती ,राजूरा,कोरपना,गोडपिपरी या 4 तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे यासाठी अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टी ग्रस्त 4 तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यात सोयाबीन, कापूस,तुर, भाजीपाला, तसेच फळबाग उभी पिके वाहून गेले आहे असुन नदी नाल्यांची शेती खरवडून गेल्याने शेतकरी वर्ग खुप मोठ्या प्रमाणावर अडचणी सापडला आहे शेतात पाणी साचल्याने कापासाची बोंड कुजलेले असुन तसेच सोयाबीन कुजली आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे अशीच परिस्थिती राहिली हातात आलेली पिके पाण्याखाली कुजली आहे सरकार कडून आता पर्यंत कुठल्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई म्हणून मिळाली नाही तर 4 तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळे त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई तातडीने खात्यात जमा करण्यात यावे तसेच त्यानं नुकसान भरपाई मिळावी या करीता अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स संघटनेचे वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधवांचे कडून आदरणीय मा ना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत निवेदन सादर करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची तत्काळ नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे अशोक जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या झालेली प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अवकाळी पावसामुळे शेती करण्यायोग्य जमीन नाही उध्वस्त झालेली असल्यामुळे त्वरीत मदत न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत याचा मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0