शहादा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. कल्पना पटेल तर सचिवपदी प्रा. अनिल जगदाळे. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) शहादा : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. कल्पना पटेल तर सचिव पदी प्रा. अनिल जगदाळे.कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच शेठ व्ही.के. शाह विद्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रा. व्ही.सी. डोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस गणेश सोनवणे, जिल्हा सल्लागार प्रा. डी.सी. पटेल, प्राचार्य सुरेखा पाटील उप प्राचार्य कल्पना पाटील उपप्राचार्य पी.बी. पटेल, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा. वाय.जी. पाटील, प्रा. ए.एम. वळवी, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.संघटन व संघटन शक्ती याविषयी जेष्ठ मार्गदर्शक प्रा. डी.सी. पटेल यांनी मार्गदर्शन केले. तर तालुक्याच्या वार्षिक अहवाल प्राणी डोळे यांनी सादर केला व संघटनेला जी ताकद आपण दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. अशी ताकद व एकता ही यापुढे देखील आपण राहू द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे तालुका अध्यक्ष उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल, तालुका सचिव प्रा अनिल जगदाळे, तालुका उपाध्यक्ष प्रा. एन.डी. निझरे, प्रा. एस.सी. चव्हाण, प्रा मनोज जाधव, कोषाध्यक्ष प्रा. एस.बी. पवार, सहसचिव प्रा. मनोज चौधरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा व्ही सी डोळे प्रा. ए.एम. वळवी, प्रा. गणेश सोनवणे, प्रा. वाय. जी. पाटील, प्रदीप साळुंखे, निर्मला पाटील, प्रा. मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. शहादा तालुक्यात पहिल्यांदाच महिला तालुकाध्यक्ष च्या मान मिळाल्याने प्रा कल्पना पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव डॉक्टर पुष्कर शास्त्री यांनी केले तर आभार प्राध्यापक चव्हाण यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0