**मानवत* राष्ट्रिय काॅग्रेसची महत्वाची कॅार्नर बैठक जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दूर्राणी यांच्या अध्यक्षखाली संपन्न. (मानवत / अनिल चव्हाण—)———————— मानवत येथे शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मा.आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाबाजानी दुर्रानी यांचा प्रभाग क्र. 8 मधील जेष्ठ नागरिक अब्दुल खालेक कुरेशी, नासर खान पठाण, सय्यद इसाक भाई, अलीम कुरेशी आदि नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून परभणी जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमोल भैया जाधव, पाथरी विधानसभा अध्यक्ष श्रीराम जाधव, वैजनाथ देवकते, युवक कॉंग्रेसचे ता.अध्यक्ष सुदर्शन कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मानवत शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वसीम कुरेशी एवन, जुबेर शेख, तनवीर खान व कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले होते.**
byMEDIA POLICE TIME
-
0