आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने " एकता दौड " चे आयोजन* (प्रतिनिधी-सुदर्शन मंडलेआळेफाटा), दि. ३१- देशाचे लोहपुरुष माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रत्येक गावात पोलीस स्टेशन च्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रमाणे आळेफाटा येथे देखील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौड (run for unity )चे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक विध्यार्थी, पोलीस कर्मचारी, अंमलदार, सूर्या पोलीस करिअर अकॅडमी चे विद्यार्थी-विद्यार्थीनी ,पत्रकार बांधव,जेष्ठ मंडळी व तरुणांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला होता. स्पर्धेची सुरुवात सकाळी साडे सहा वाजता आळेफाटा पोलीस स्टेशन पासून ते आळेफाटा बायपास -स्वामी समर्थ मंदिर -आळेफाटा चौक अश्या प्रकारे पाच कि. मी अंतराची होती. नंतर सहभागींना पोलीस स्टेशनच्या वतीने केली, ors आणि,अल्पोहार वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने " एकता दौड " चे आयोजन*                                                                                                                 
Previous Post Next Post