दिनांक 22/11/2025 शनिवार रोजी *ह.भ.प.संभाजी महाराज* *मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. पवार साहेब*.व *मा.लालासाहेब जाधव* *मा.रमेशजी वाघ* तसेच इतर सहकारी सह पुराण काळातील पट्ट्या चा. गड,,(विश्राम गड)किल्ल्यांवर 22 नोव्हेंबर चे औचित्य साधून छोटा खाणी कार्यक्रम आयोजित केला.त्यात मु.पो.ओढा.ता.जि.नाशीक येथील शाळेची सहल आयोजित करून त्या विद्यार्थ्यांना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास समजून सांगण्यात आले.22 नोव्हेंबर 1679 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जालना,छ.संभाजी नगर मोगलांच्या ताब्यात असतांना तेथे छापा टाकून 2500 सैनीकांन सह बरोबर धन द्रव्य घेऊन जात असतांना मोघलांनी 10 हजार सैन्यासह पाठलाग करून संगमनेर जवळ चंदनापरी घाटात आजच्या रायतेवाडी येथे अडवीले तिन दिवस लढाई युद्ध झाले.आपल्या सैनिकांनी निकारा चा लढा दिला..त्यात गुप्तहेर खातं मार्फत माहिती मिळाली की छ.संभाजी नगर येथून मोघलांची 10 हजार नव्या दमाची सैनिकांची तुकडी येत आहे.त्या वेळी प्रसगांचे गांभिर्य ओळखून स्वराज्य गुप्तहेर संघटना प्रमुख बहीर्जी नाईक यांनी काही निवडक सैनिक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्त रस्त्याने सुखरुप पट्ट्या च्या किल्ल्यावर पोहोचवले तर चंदनापुरी घाटात रायतेवाडी जवळ लढणारी आपले फौज मधले काही मावळे लढता लढता धारातीर्थी पडले तर महाराज सुखरूप संकटातून बाहेर पडले व पट्ट्या च्या किल्ल्यावर पोहोचले हि इशारत मिळताच आपले मावळे गनिमी कावा ने जंगलात पसार झाले.त्या वेळी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्ट्या च्या किल्ल्यावर तब्बल 33 दिवस विश्रांम केला.म्हणून पट्ट्या च्या गड किल्ल्याचे नाव *विश्राम गड* असे नाव देण्यात आले.म्हणून रोज. **22 नोव्हेंबर 1679* रोजी महाराज विश्राम गडावर आले ते औचित्य साधून आम्ही सर्व शिवप्रेमी मंडळी ने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करून ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Previous Post Next Post