भायखळ्यात मोठी कारवाई !रेल्वे ऑफिसर्स क्वार्टरमध्ये तीन घरे फोडणारा सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात .. (!मुंबई - (यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक ) भायखळा रेल्वे कंपाउंड ऑफिसर्स क्वार्टरमध्ये झालेल्या तीन घरफोड्यांचा पर्दाफाश सर जेजे मार्ग पोलिसांनी केला असून, सराईत आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली आहे.दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी ऑफिसर रेल्वे वसाहतीत, रेल्वे अधिकारी ड्युटीवर असताना दरवाजे तोडून चोरी केल्याचा गंभीर गुन्हा नोंद झाला होता.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तपासात आरोपी बेंगळुरूला पळून गेल्याचे उघड झाले.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.तपासात आरोपी बेंगळुरूला पळून गेल्याचे उघड झाले.गुन्हे प्रकटीकरण अधिकारी PSI प्रशांत नेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग दोन महिने तपास केल्यानंतर आरोपीवर काटेकोर पाळत ठेवली.आणि अखेर गोरेगाव रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक केली.या कारवाईमुळे तीन घरफोडींचा गुन्हा उघडकीस आला आहे.या यशस्वी ऑपरेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांचे मार्गदर्शन लाभले.तपास पथकःPSI प्रशांत नेरकर, पोह तडवी, पोशि घाडगे, पोशि कोलपुसे, पोशि डावरे, पोशि शेवरे, पोशि चौधरी.
byMEDIA POLICE TIME
-
0