व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चंद्राचेंगरी मध्ये सात महिला व दोन लहान मुलांचा मृत्यू, दिनांक १ नोव्हेंबर२०२५ आंध्र प्रदेश मधील श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये काशीबुगा मधील, वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये, एकादशी असल्याकारणाने मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धालू आलेले होते, त्यामुळे मंदिराच्या आवारामध्ये खूप मोठी गर्दी जमा झाली, दर शनिवारी या मंदिरामध्ये दहा ते पंधरा हजार भक्तगण यायचे, परंतु एक नोव्हेंबर रोजी एकादशी असल्याकारणाने 25 हजाराच्या वरती श्रद्धालु वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी आले , आणि या अतिरिक गर्दीमुळे महिलांच्या लाईन मध्ये दर्शनासाठी ओढ तानीला सुरुवात झाली , ओढ तानीमुळे स्टीलचे ड्रिल तुटून पडली , त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, महिला भक्तांनी पळापळ करण्यास सुरुवात केली. व या चंद्राचंंगरीमध्ये सात महिला व दोन लहान मुले मृत्यूमुखी पडले, ही माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन टीम मदत करण्यासाठी आली, त्यानंतर आंध्रप्रदेशचे कृषिमंत्री के आचन नायडू त्वरित घटनास्थळी आले, त्यांनी मंदिर प्रशासनाचे निरीक्षण केले, जमावाला काबु करण्यासाठी व जखमींना मदत करण्यासाठी पोलीस दल तैनात करण्यात आले, श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये काशीबुगा मधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये चंद्राचेंगरी झाली ,ही घटना खूपच दुःखद आहे ,मृत्युमुखी पडलेल्या भाविक भक्तांच्या परिवाराच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे असे कृषी मंत्री यांनी म्हटले , परंतु कुणाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याने काही फायदा होत नाही, कारण या शासनाच्या प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तर भक्तांचा जीव तर गेलास, त्यामुळे सर्व जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळायला हवे ,हे कडू आहे पण सत्य आहे, मंत्र्याने फक्त सातवना दिली ,शासन फक्त दोन पैसे देऊ शकतो , मात्र अनमोल किमतीचा जीव मात्र आपण गमावून बसतो, हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवा, व गर्दीच्या ठिकाणी जायला टाळायला हवे , तरच आपण सुरक्षित राहू शकतो , सण ,उत्सव ,मंदिर, मंदिरातील मुर्त्या ,भक्तांना असे नाही सांगत की तुम्ही शेकडो किलोमीटर वरून माझ्या दर्शनासाठी तुमचे जीवन धोक्यात टाकून माझ्या दर्शनासाठी नियम तोडत निसर्गाचे समतोल बिघडवत माझ्यापर्यंत यावे ,व माझे दर्शन घ्यावे, परमेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आहे, आपल्याच हृदयाला परमेश्वर समजावे ,व भुकेल्यांना अन्न गरिबांना दोन पैशांची मदत द्यावी हीच परमेश्वराची भक्ती आहे, पत्रकार अंबादास संतोष जाधव

व्यंकटेश्वर स्वामी  मंदिरात चंद्राचेंगरी मध्ये  सात  महिला व दोन लहान मुलांचा मृत्यू,                                                            
Previous Post Next Post