अमरावती विभागाकडून धर्माबाद बस स्थानकाचे मूल्यांकन. धर्माबाद ता.प्र.महाराष्ट्र शासन राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी धर्माबाद बस स्थानकाची तपासणी अमरावती विभाग प्रमुख निलेश बेलसरे व कामगार अधिकारी विजय गोले यांच्याकडून करण्यात आली.शिवसेनेचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात आले. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.या मुल्यांकनात गेल्या वर्षी सन 2024 मध्ये निमशहरी क वर्षातुन धर्माबाद बस स्थानकाला तृतीय पारितोषिक मिळाले होते.सन 2025 मध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत शासनाने नियुक्त केलेल्या तिसऱ्या मूल्यांकन समितीचे पदाधिकारी तथा राज्य परिवहन अमरावतीचे विभाग प्रमुख निलेश बेलसरे,राज्य परिवहन कामगार अधिकारी विजय गोले, दक्षता समिती सदस्य तथा जेष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, प्रवासी मित्र तथा पत्रकार गजानन वाघमारे यांनी धर्माबाद एसटी बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण बस स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण, गार्डन, सुरक्षा व्यवस्था, सफाई कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली.यावेळी बिलोली आगार व्यवस्थापक नरसिंग निम्मनवाड, बाभळी बंधारा कृती समिती अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर,धर्माबाद बस स्थानक वाहतूक नियंत्रक व्ही.एन. अनमोड, वाहतूक नियंत्रक रमेश वाघमारे , सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक साईनाथ घंटे ,सफाई कामगार मनोज जोगदंड,रत्नपाल मोरे यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0