भाजप-राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ.साधना नितीन चौधरी यांची प्रचारात जोरदार आघाडी..दिमतीला राजकीय धुरंधरांचा ताफा. नोव्हेंबर २९, २०२५ भाजप-राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ.साधना नितीन चौधरी यांची प्रचारात जोरदार आघाडी..दिमतीला राजकीय धुरंधरांचा ताफा ..चोपडा दि.३०(प्रतिनिधी) : चोपडा नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार सौ.साधना नितीन चौधरी यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या धडाकेबाज नेत्यांच्या दमदार भाषणांनी चोपडा भाजपमय झाला आहे. तसेच तोबा गर्दीत शहरातील चप्याचप्प्यात प्रचार होत असल्याने प्रचारात आघाडी घेतली आहे.सौ साधनाताई नितीन चौधरी यांच्या प्रचार धूम धडाका सुरू असून माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती,माजी नगराध्यक्ष मनिषाद ताई चौधरी, माजी नगरसेवक जीवन भाऊ चौधरी, चोपडा पीपल बँक अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराती, माजी चोसाका चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, पणन संघ संचालक रोहित दादा निकम, शांताराम पाटील चंद्रशेखर पाटील, शहर प्रमुख श्याम सिंग परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा फौजफाट्यासह प्रचार दमदार होतं आहे. अनेक राजकीय धुरंदरांनी राजकीय ताकद पणाला लावली असल्याने प्रचारात मतदारांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न होत असून भाजपाने विजयाच्या दावा केला आहे.

भाजप-राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ.साधना नितीन चौधरी यांची प्रचारात जोरदार आघाडी..दिमतीला राजकीय धुरंधरांचा ताफा.     
Previous Post Next Post