*भद्रावतीत संतमूर्ती पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती :- हनुमान मंदिर उत्सव समिती किल्ला वार्ड, विठ्ठल मंदिर चौक, भद्रावती यांच्या वतीने श्री संतमूर्ती स्थापना दिनानिमित्त 30 ऑक्टोबर रोजी श्री संतमूर्ती पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिरातून शिवलिंग, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तींची पालखी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. तसेच 31 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक, दहा वाजता होम-हवन व आरती, सायंकाळी सहा वाजता संगीतमय सुंदरकांड व सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.ओम हवनाची पूजा हनुमान उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, जान्हवी शिंदे, नकुल शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. पौरोहित्य विनायक महालक्ष्मी यांनी केले. संगीतमय सुंदरकांडाच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे भाविक अगदी तल्लीन झाले होते.या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व संचालक जयंती टेमुर्डे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत शिंदे, नकुल शिंदे, संदीप उपलंचीवर, प्रसाद वेलफुलवार, रजत शिंदे, अक्षय शिंदे, प्रवीण मित, अनिरुद्ध महालक्ष्मी, अनिरुद्ध डंभारे, दीपक पारधे, संदीप कल्ले, प्रशांत बेलफुलवार, बालू ताटे, रमेश गुंडावार, अमोल शिंदे, प्रवीण पारधे, सचिन बेलफुलवार, कुणाल चौधरी, पप्पू उपलंचीवार, प्रवीण नीत, लूकेश बोरकर, विशाल चटपलीवार, युवराज खामनकर आदींसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

भद्रावतीत संतमूर्ती पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*.                                                            
Previous Post Next Post