श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सव; भाविकांचा उत्साह ओसंडणार.....** विशेष आकर्षण : भाविकांसाठी भव्य महाप्रसाद व कार्तिक मास मांड वाढवा सोहळा चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थान श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळत आहे. उत्सवाचे आयोजन दि. ५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) रोजी करण्यात आले असून, कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता चंदनउटी व रमणा सोहळ्याने होणार आहे. दुपारपासूनच भाविक भक्तांची गर्दी मंदिर परिसरात होण्यास प्रारंभ होईल. संध्याकाळी ६ वाजता कार्तिक मास काकडा समाप्ती भजन गजरात पार पडेल. यानंतर सायं. ७ वाजता सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचे दाते अनिल भानाजी राऊत (नागपूर) असून, संपूर्ण महाप्रसाद त्यांच्या स्वखर्चाने तसेच अन्नदान समितीच्या नियोजनात दिला जाणार आहे. तसेच दि. ६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ९ वाजता कार्तिक मास मांड वाढवा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी सकाळपासून अवधूत नामस्मरण, भजन आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी व ग्रामस्थांनी तन-मन-धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री विठोबा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी व समस्त विश्वस्त मंडळा तर्फे करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चंदनउटी व रमणा उत्सव; भाविकांचा उत्साह ओसंडणार.....** विशेष आकर्षण : भाविकांसाठी भव्य महाप्रसाद व कार्तिक मास मांड वाढवा सोहळा                              
Previous Post Next Post