*पोलिसांची कारवाई मुद्देमालासह आरोपी अटकेत* *भद्रावती पोलिसांची तत्परता*. ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.4:-दीपावली उत्सवाच्या धामधुमीत तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथून दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता फिर्यादी मनोज ऋषी दुर्योधन रा.भद्रावती यांची काळ्या रंगाची SZR यामा कंपनीची गाडी क्रमांक MH 34 AM 3312 नियोजित जागेवर दिसत नसल्याने फिर्यादीने दिनांक २९ ला स्थानिक पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात अपराध क्रमांक.५९२/०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून शोध मोहीम राबविली.स्थानिक पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर तत्परतेने तपास करून आरोपी नामे शाहिद अन्वर शेख वय १८ रा. डोलारा तलाव, पंचशील वॉर्ड भद्रावती यास मुद्देमालासह अटक केली. व त्याचे कडून अंदाजे किंमत ५०, ००० रु किमतीची वरील वर्णनाची मोटार सायकल जप्त करण्यात आली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी वरोरा संतोष बाकल, यांचे मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सपो. महेंद्र बेसरकर, पोहवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चूदरी, पोलिस अंमलदार रोहित चिटगीरे, खुशाल कावळे, मंगेश घाटोळे, संतोष राठोड आदींनी कार्यवाही पार पाडली.पोलिसांच्या तत्पर कारवाई चे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

पोलिसांची  कारवाई मुद्देमालासह आरोपी अटकेत* *भद्रावती पोलिसांची तत्परता*.                                                              
Previous Post Next Post