जुन्या दिग्गजाच्या नाकी नऊ, विकासकामाला लागले ग्रहण! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.4- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात  जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील निवडणुकी एकूणच रंगतदार ठरणार असल्याचे चित्र दिसत आहेत. या निवडणुकासाठी जुन्या दिग्गजानी व नवीन चेहऱ्यानी सुद्धा जोरात मोर्चे्बांधणी सुरु केली असून  मोठया दिग्गज नेते मंडळीचे जोरात आवागमन सुरु झाले असून जनतेच्या मुद्द्याला धरून फुकटची सोंग उभी केल्याचे दिसून येत आहे. आता निवडणूच्या तोंडावर येताच ठीक ठिकाणी कंपन्यावर आंदोलन,मोर्चे, सुरु करून विविध प्रलोभन व आश्वासने देऊन बेरोजगार युवकांची व जनतेची बड्या राजकीय नेत्यांकडून दिशाभूल सुरु केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागील १५ वर्षापासून  झालेल्या भद्रावती तालुक्यातील प्रगतीला मोठे ग्रहण लागले आहे तालुक्यातील अनेक खेडो पाड्यातील रस्त्याची मोठी दुर्देशा व विकासकामात मोठी हेळसांड पाहताचक्षणी लक्षात येते तालुक्यातील जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याचा अभाव सर्वत्र दिसून येते. यामुळे सामान्य जनतेच्या मनात विविध उठणारे प्रश्न आहेत त्यापैकी ठप्प व दुर्लक्षित झालेल्या विकासासाठी  जबाबदार कोण? मोठे राजकीय दिग्गज कि सर्वस्वी जनता जबाबदार आहे हा प्रश्न  मनाशी चांग धरून आहे. दरम्यान जिल्हा परिषद आरक्षण पद्धत पाहता महिला राज पुन्हा प्रस्थापित होईल अशी आशा आहे त्यामुळे अनेक दिग्गजंच्या नाकी नऊ आले असून अंगाला घामही फुटल्याचे दिसून येत आहे कारण जनता विचारताय तुमच्याकडे एवढे वर्ष सत्ता सूत्र असूनही आपला परिसरात विकासकामाचा अभाव का? कुणी तुमचे हाथ बांधले होते कि तुम्ही फक्त आणि फक्त राजकारणाच्या माध्यमातून स्वतः चा विकास केला आणि या सर्व बाबी जनतेच्या नजरेतून काही लपून राहणार नाही.अश्या दैयनीय परिस्थितीत जर  जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचायत मधील निवडणुकीत नवीन विकास व अमुलाग्रह बदल घडवून आणयाचा असेल जुन्या राजकीय खेळी करणाऱ्या चेहऱ्यांना भाव न देता नवीन अनोळखी  चेहरा निवडणुकीत उतरला  तर जनता नक्कीच त्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत देतील यामुळे अनेक दिग्गजाची मनात घालमेल होऊन भद्रावती तालुक्यातील राजकीय खेळातील दिगज्जाचीं हवा टाईट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जुन्या दिग्गजाच्या नाकी नऊ, विकासकामाला लागले ग्रहण!                                                                           
Previous Post Next Post