*भरदिवसा घरफोडी करत ८५ हजारांचा मुद्देमाल नेला चोरून*. वर्धा( हिंगणघाट ) : घराला लावलेले कुलूप तोडून अज्ञात आरोपीने घरफोडी करत ४५ हजार नगद व इतर साहित्य असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना शनिवारी संत कबीर वार्ड परिसरात घडली. याप्रकरणी दशरथ वामनराव मुंगले (४८, रा. संत कबीर वॉर्ड) यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारकर्ता यांचे तीन रूमचे घर आहे. त्यांच्या घराशेजारी आई ही एकटीच राहत असते. शुक्रवारी कामानिमित्त गिरड येथे दुचाकीने गेले असता. दशरथ यांच्या आईचा फोन आला व सांगिले की, घराचा दरवाजा खुला आहे व घरातील साहित्य अस्तव्यस्थ पडून आहे. घरी येऊन पाहणी केली तर घरातील ८५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निर्दशनास आले.

भरदिवसा घरफोडी करत ८५ हजारांचा मुद्देमाल नेला चोरून*.                                                                                   
Previous Post Next Post