अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात!मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला ५१ लाखांचा धनादेश. . . . . . . . . . . . . . . जळगाव– राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल ५१ लाख रुपये इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केला.यावेळी संचालक रमेश हिंगणकर,पांडुरंग घुगे,नितीन हिवसे, बळवंतराव पाटील,अशोक हटकर,भागवतदास तसेच व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “सहकार क्षेत्रातील संस्थांकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल.राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.”शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना – उपाध्यक्ष रोहित निकम“शेतकऱ्यांचे दुःख हे आपल्या समाजाचे दुःख आहे. सहकार क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळावा, हीच आमची भावना आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0