गोगरी गावात दिवाळीच्या सुट्टीत दहा दिवसाचे विद्यार्थींचे शिबीर आयोजन सामाजिक कार्यकर्ते-- मार्गदर्शक गुरुवर्य श्री विनोदभाऊ जाधव _____________________________________________मंगरळनाथ--मंगरूळनाथ तालुक्यातील शेलूबाजार जवळील गोगरी गावामध्ये मार्गदर्शक व गुरूवर्य श्री विनोददादा जाधव आणि आयोजक माजी सैनिक विनोद पवार यांच्या संकल्पनेतून दिवाळी च्या सुट्टीमध्ये मुलं व मुलींमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी आणि वाईट मार्गाला न जाता दहा दिवसाचे विद्यार्थींना व्यायामाचे व चांगली संस्कृती आणि व्यसनमुक्ती निरोगी राहण्यासाठी त्यांनी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने दहा दिवस व्यवस्थित कार्यक्रम पार पाडून समारोप केला दिवाळी सुट्टीतील दहा दिवसीय आयोजित व्यायाम व सुसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक तानाजीराव जाधव प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे साहेब विनोद पाटील जाधव तर विशेष उपस्थितीमध्ये मंगरूळपीर येथील राज्य सरकार छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सागर गुल्हाने व सुमित मुंद्रे हे होते शिबिर आयोजक माजी सैनिक कॅप्टन विनोद पवार व अमोल बोथे राहुल साखरे सह गावातील माजी खेळाडूंनी सुद्धा प्रशिक्षक म्हणून आपले योगदान दिले l यशस्वीरित्या दहा दिवस सुसंस्कार व्यायाम व लेझीम च्या विविध चाली लाठीकाठी दानपट्टा तलवारबाजी सह मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले शेवटी प्रशिक्षणार्थी च्या पाल्यांनी आपल्या मनोगताद्वारे या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.आणि विनोद जाधव यांनी आपले मनोगत विचार व्यक्त करतांना म्हणाले की, आजच्या वर्तमान काळात ईप्रणाली,, कम्प्युंटर, मोबाइल, वेबसाइट्स, फेसबुक, ईमेल, व्हाट्सअप च्या द्वारे तरूण पिढी बिघडत चालली आहे त्यांचे आयुष्य खराब होत आहे आणि करिअर वर परिणाम होत आहे मुलं मोबाईल मध्ये टाईमपास करत आहे पुर्वी च्या ४० ते ५०, वर्षे अगोदर गावागावात व्यायाम शाळा असायच्या यामुळे आणि दुसरे काही साधने नसल्याने व्यायाम शाळा मध्ये आवड निर्माण व्हायची आता आधुनिकतेच्या काळामध्ये ही लोप पावत चालली आहे त्यामुळे आता पुन्हा गावोगावी अशा शिबीराची आवश्यकता आहे यामुळे तरूणांना व्यसनमुक्त आयुष्य जीवन जगता येईल आणि योग्य अशी दिशा मिळेल आणि खेळाची आवड निर्माण होईल.शेवटी विद्यार्थी यांनाही चर्चेतून आपल्याला एक चांगली दिशा मिळाली असे विद्यार्थी यांनी व्यक्त केले.शिबीरात अनेक मुले व मुलीसह, तरूण वर्ग,पालकांची उपस्थिती होती.
byMEDIA POLICE TIME
-
0