प. स. बडूर गणातुन भाजपाचे, साहेबराव आंजनिकर इच्छुक. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड : बिलोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, निवडणुकाच आरक्षण जाहीर झाल्यानंतर, अनेक इच्छुक असल्याचे वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होत, आहेत यातच, भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असलेले, कार्यकर्ते जिल्हा संयोजक,झोपडपट्टी सेल नांदेड जिल्हा अध्यक्ष, व माजी सरपंच प्रतिनिधी, हिप्पारगा थडी. साहेबराव पिराजी आंजनिकर, बडुर गनातून इच्छुक असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे, सगरोळी सर्कल मधील,बडूर गण अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव असल्यामुळे,बडूर गणातील साहेबराव आंजनिकर यांचे चाहते, कार्यकर्ते बडूर गण लढवावं असे विनंती करत आहेत, साहेबराव अंजनीकर यांनी गेल्या वेळेस सगरोळी गण लढवले,त्या वेळेस चांगल्या प्रकारे त्यांना मतं मिळाली, गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामान्य लोकांचे,गोरगरीबांचे अडचणी सोडवणे, व समाज सामाजिक कार्यात,सहभाग घेणे त्यामुळे, त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झालेला आहे,व आजनिकर,आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या जवळचे मानले जातात, भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास त्या संधीचा सोनं करेन,असे आमच्या प्रतिनिधी शी साहेबराव आंजनिकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प. स. बडूर गणातुन भाजपाचे, साहेबराव आंजनिकर इच्छुक.                                                                              
Previous Post Next Post