दि. २८ नोव्हेंबर :भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोकुलधाम येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट शहरासह परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.‘लाडकी बहिण योजना बंद होणार’ या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावत, “योजना अबाधित सुरू राहणार आहे,” असा विश्वास दिला. याचबरोबर राज्यात ‘लखपती दीदी’ ही नवी योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण आणि छोट्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून ४०० छोट्या शहरांत घनकचरा व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.सभेला पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंगणघाटातील महत्त्वाच्या चालू आणि आगामी प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री आणि आमदारांनी सभेत मांडला.यामध्ये समृद्धी महामार्गाचे चंद्रपूरशी जोडणीकरण, अमृत योजनेतील १२ जलकुंभ, ४०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वणा नदीवरील ६० कोटींचा बंधारा, १७ कोटींचे नाट्यगृह व सांस्कृतिक भवन, नवीन बसस्थानक, उड्डाणपूल, जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत, नगरपरिषद व एसटी महामंडळाच्या इमारती अशा प्रकल्पांचा समावेश आहे.नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर यांचा उल्लेख करताना त्यांच्या घनकचरा व्यवस्थापनातील डॉक्टरेटमुळे शहरात आदर्श निर्माण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.हिंगणघाटला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले आमदार समीर कुणावार यांनी कॅन्सर हॉस्पिटलची मागणी मांडली असून यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. शेतकऱ्यांसाठी दिल्या गेलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीचा उल्लेख करून “२ डिसेंबरला भरभरून मते द्या; सरकार तुमची काळजी घेत राहील,” असे आवाहन त्यांनी केले.लाड़की दीदी ना यावेळी २४ गंभीर आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी नवी आरोग्य योजना लवकरच लागू होणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.गोकुलधाम परिसरातील सभा उत्साहात पार पडली. महिलांची उपस्थिती विशेषत्वाने लक्षणीय होती. दुपारी दीडची वेळ देण्यात आली असतानाही मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने हिंगणघाटच्या बिडकर महाविद्यालयात उतरून तब्बल ४.२२ वाजता सभास्थळी दाखल झाले.देवेन्द्र फडणवीस/सभा समाप्तीला हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगरपालिकेतील भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन पालकमंत्री पंकज भोयर यांनी केले.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0