**अनंतराव गोलाईत यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड.*. (*मानवत / प्रतिनिधी.* )—————————————जेष्ठ संशोधक, साहित्यिक, लेखक, प्रखर वक्ते व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करुन ज्ञान संकलन करुन देशामध्ये परीवर्तन घडविण्यासाठी तसेच १२ मावळ फाउंडेशनच्या माध्यमातून समाज सेवा करणारे व सनय छत्रपती शासनचे प्रमुख मा. नामदेवराव जाधव यांच्या विचारावर विश्वास ठेवुन कार्य करणारे अनंतराव गोलाईत यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या मानवत तालुक्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, समाजातील विविध क्षेत्रामध्ये केलेले कार्य, दिलेले योगदान याची दखल घेत तसेच त्यांनी आत्तापर्यंत केलेली समाजसेवा उल्लेखनीय असुन त्यांच्या कार्यतत्परतेला दाद देवुन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली तसेच ते पर्यावरण, रोजगार, आरोग्य, शिक्षण यावर उपाय योजना करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष मुकुंद देशमुख यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी अमोल गोलाईत, अॅड. भागवत दहे, साहित्यिक राजेश धणघाव, अमिनभाई पठाण यांच्यासह यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनंत गोलाईत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.***
byMEDIA POLICE TIME
-
0