२६ नोव्हेंबर रोजी आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात हिंगणघाट येथे दिनांक २६ रोजी भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. १९४९ साली याच दिवशी भारताचे संविधान सभेने संविधानाला अंतिमरूप दिल्याच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी पाळला जातो.आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आज २६ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला,यावेळी आमदार समीर कुणावार यांचे सह भाजपा ज्येष्ठ नेते किशोर दिघे, माजी जि.प.सदस्य नितीन मडावी, प्रा. डॉ. उमेश तुळसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आ.कुणावार यांनी संविधान निर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून आधुनिक भारताच्या बांधणीमध्ये संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. आपण सर्वांनी संविधानाचा सन्मान राखण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0