कुरझडी (जा.) येथे श्रमदानातुनवनराई बंधरा निर्मिती.. ‌(वर्धा प्रतिनिधी:आशिष जाचक,) दि. २६/११/२०२५ बुधवार तालुका कृषी अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या पुढाकारातून वर्धा नजिकच्या कुरझडी जा. येथे गावाजवळील वाहत्या नाल्यावर ह्या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. ह्या बंधारा निर्मितीचे मुख्य उद्धिस्ट म्हणजे समोर येणाऱ्या दिवसात पाण्याची कमतरता भासू नये आणी आजू बाजूच्या शेतकरी बांधवाना आपल्या पिकांना यातून पाणी मिळावं हा उद्देश आहे.त्यातच उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या जनावराणा पाणी पिण्या साठी सोईचे होईल ,या साठी हे बंधाऱ्याचे काम करण्यात आले असून ह्या बंधरा निर्मिती साठी गावातील शेतकरी बांधव व गावकरी यांनी श्रमदान करून ,हा समाजिक संदेश प्रत्येक गावात पोहचून सर्वानी हा उपक्रम आमलात आणला पाहिजे. बंधरा निर्मिती साठी प्रामुख्याने उपस्थिती साह्यक कृषी अधिकारी घाटूर्ले म्याडम,पुलिस पाटील प्रगती धनविज,समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, रवींद्रजी भिडकर,मनोहर दुर्गे,निलेश घोडे,शन्कर उईके,ग्रामपणचायत कर्मचारी गजानन कावलकर, आशिष सर,नरेंद्र दहेलकर,आदिनी सहकार्य केले तर कृषी सह्याक यांनी ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवानी श्रमदानातुन सहकार्य केल्या बद्दल अभिनंदन करून आभारही वेक्त केले...

कुरझडी (जा.) येथे श्रमदानातुनवनराई बंधरा निर्मिती.. 
Previous Post Next Post