कोरपावली येथील मल्हारी महात्म सप्ताहास प्रारंभ.. (शुभम बारी यावल ग्रामीण प्रतिनिधी)– तालुक्यातील कोरपावली येथे २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान मल्हारी महात्म्य सप्ताह साजरा होणार असून या सप्ताहास आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत प्रांरभ झाला. तर २६ रोजी खंडोबा मूर्तीचा प्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाणार आहे.कोरपावली येथील डी. एच. जैन विद्यालयात मल्हारी महात्म्य सप्ताह दरम्यान, कोरपावली येथील ग्रामदेवता, कुलदेवता आणि आचार्य राकेशप्रसाद दासजी महाराज, शाखी धर्मप्रसाद दासजी, शास्त्री भक्ती प्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने कोरपावली येथील स्वामीनारायण मंदिराद्वारा नवनिर्मित येथील खंडोबा मंदिर येथे २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामसमृद्धी, सुख- शांती व सत्संग अभिरुद्धीसाठी भव्य सप्तदिनात्मक मल्हारी महात्म्य कथा आयोजित करण्यात आली आहे. या पवित्र प्रसंगी परिसरातील सर्व संत, महंत उपस्थित राहून आपल्या दर्शन व आशिर्वचन लाभ देतील. तर खंडोबा मूर्तीचा प्रतिष्ठान सोहळा २६ नोव्हेंबर अर्थात चंपाषष्ठीला दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे. कथा वाचक व मंदिर निर्माण कर्ता शास्त्री भक्तीस्वरूपदासजी (वेदांत व्याकरणाचार्य) हे काप पाहत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शास्त्री भक्तीप्रियदासजी करीत असून . या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शास्त्री धर्मकिशोरदासजी, शाखी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री अनंतप्रकाशदाजी, पार्षद दीपक भगतजी हे करत आहेत. तर सर्व ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्ट आयोजकाकडून करण्यात आले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0