**मतदान केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचार्‍यांचे २ रे प्रशिक्षण संपन्न.*. { मानवत नगर परिषद निवडणूकीसाठी नियूक्त केलेल्या कर्मचार्‍यांचे जिजाऊ सभागृहात २रे प्रशिक्षण संपन्न. }*मानवत { अनिल चव्हाण. }*——————————————नगरपरिषद मानवत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या जिजाऊ सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी अधिकारी कर्मचारी यांची २ रे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सविस्तर वृत्त असे की, मानवत नगर परिषदेसाठी दिनांक २/१२ /२०२५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी असे एकूण 200 अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी 188 इतके कर्मचारी हजर असून 12 प्रशिक्षणार्थी गैरहजर होते. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तात्काळ गैरहजर बाबतचा खुलासा मागविण्यात आला. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांना EVM मशीन हाताळने, ईव्हीएम मशीन सह इतर साहित्य अगोदरच्या दिवशी साहित्य घेण्यापासून ते मतदान केंद्र उभारणी करणे, दुसऱ्या दिवशी मॉक पोल घेणे, मतदान सुरू करणे वेळोवेळी मतदानाची आकडेवारी क्षत्रिय अधिकारी यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविणे मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी समजावून सांगितल्या मतदान संपल्या नंतर मतदान साहित्य जमा करणे बाबतची सर्व इंथमभूत माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण मध्ये देण्यात आली.यावेळी मास्टर ट्रेनर विलास मिटकरी जिल्हा परिषद शिक्षक उक्कलगाव व त्यांची सहकारी मास्टर ट्रेनर टीमने ई.व्ही.एम, बाबत ई.व्ही.एम. यंत्र कसे हाताळले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंबुरे संगणक ऑपरेटर राहुल खाडे व मानवत नगर परिषद मधील अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते.***

मतदान केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचार्‍यांचे २ रे प्रशिक्षण संपन्न.*.                                                                            
Previous Post Next Post